Rakhi Jadhav 
महाराष्ट्र बातम्या

NCP Rakhi Jadhav: राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव; 6 जिल्ह्यांवर राहणार वर्चस्व

नवाब मलिकांच्या जागी राखी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Maharashtra Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्यावर विभागीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी होती. यानंतर आता त्यांच्यावर आजपासून मुंबई विभागातील सर्व ६ जिल्ह्याच्या संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याबाबत अधिकृत पत्र प्रसिद्ध करत माहिती दिली आहे. (Rakhi Jadhav oppointed as NCP Mumbai President also given responsibilities of 6 districts)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे नियुक्तीचं पत्र काढलं असून याद्वारे मुंबई विभागातील जिल्ह्यांवर पक्षाची पकड कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांनी आपल्या आठ सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथही घेतली. यामुळं राष्ट्रवादीनं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर उर्वरित सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांना ५ जुलैपर्यंत परतण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

नरेंद्र राणे आणि राखी जाधव मुंबई विभागीय कार्याध्यक्ष होते. पण यांपैकी नरेंद्र राणे यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला हजेरी लावल्यानंत त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT