महाराष्ट्र

भाजपकडून वाचाळवीरांची प्रवक्तेपदी फेरनेमणूक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या असून भाजपच्या प्रदेश सचिवपदी राजेश पांडे तर प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षपदी एजाज देशमुख (बीड) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तर आपल्या बोलण्याने पक्षाला अडचणीत आणणारे प्रवक्ते आमदार राम कदम आणि अवधूत वाघ यांची प्रवक्तेपदी फेरनिवड करण्यात आली आहे. आमदार कदम आणि वाघ यांना सक्त सूचना करून प्रवक्तेपदी कायम करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

इतर नेमणुका पुढीलप्रमाणे -
प्रदेश व्यापारी आघाडी संयोजक – महेशकुमार कुकरेजा (नागपूर)
प्रदेश कामगार आघाडी संयोजक – गणेश ताठे
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष – उदय पटवर्धन
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख – शिरिष बोराळकर
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख – मकरंद देशपांडे
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ सहनोंदणी प्रमुख – राजेश पांडे
प्रदेश प्रवक्ता – आ. राम कदम
प्रदेश प्रवक्ता – अवधूत वाघ
माध्यम सहसंपर्कप्रमुख – ओमप्रकाश चौहान
माध्यम सहसंपर्कप्रमुख – श्याम सप्रे
माध्यम सहसंपर्कप्रमुख – सौमेन मुखर्जी

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात नोंदणीसाठी मकरंद देशपांडे यांना राजेश पांडे सहाय्य करतील, असेही सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT