Ramdas Athavale on Shiv Sena | Maharashtra Political News 
महाराष्ट्र बातम्या

रामदास आठवलेंचे खरी शिवसेना बाबत मोठे विधान, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मिरज : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. त्यांच्यासोबत काही आमदारही आहे. यामुळे खरी शिवसेना शिंदे यांची असेच बोलले जात आहे. यावरून चर्चाही सुरू झाल्या आहेत. यामुळे खरी शिवसेना कोणती, असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहे. अशात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी खरी शिवसेना कोणती यावर आपले मत व्यक्त केले आहे. (Ramdas Athavale said, the real Shiv Sena belongs to Eknath Shinde)

रामदास आठवले यांनी मिरजेत पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी त्यांची मागणी आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचे भविष्य नाही, असेही ते म्हणाले.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कधीही सत्तेसाठी समझोता केला नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले. मात्र, यातून एकनाथ शिंदे बाहेर पडले. यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचा दावाही रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केला.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैसर्गिक युतीमुळे अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी बंड केले. महाविकास आघाडीला आता तोंड काळे करण्याची वेळ आली आहे.

राज्यात सत्तेत असतानाही सेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती. त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. केवळ भाजपवर आरोप करून सत्ता राखण्याची महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. आता एकनाथ शिंदे यांनी सरकारलाच सुरुंग लावला आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT