ramdas athawale
ramdas athawale sakal media
महाराष्ट्र

...म्हणून MIM आहे साईडलाईन! आठवलेंनी कवितेतून दिली 'गाईडलाईन'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एमआयएम आणि महाविकास आघाडी (MIM Mahavikas Aghadi Alliance ) यांच्यात युतीच्या चर्चांनी जोर धरलेला असताना आता यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील उडी घेतली आहे. विशेष म्हणजे आठवले यांनी त्यांच्या खास शैलीतील कविता सादर करत एमआयएमला मोलाचा सल्लादेखील दिला आहे. (Ramdas Athawale Poem On MIM)

आठवले यांनी केलेल्या कवितेत ते म्हणतात की, ''एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन. एमआयएमशी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.'' असा सल्लाच कवितेच्या स्वरुपातून आठवले यांनी एमआयएमला दिला आहे.

एमआयएमचा कट उधळून लावा; उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सूचना

एमआयएम महाविकास (MIM) आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचा प्रस्तावा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) शनिवार दिला होता. त्यानंतर खासदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत हा सर्व एमआयएमचा कट असून, तो उधळून लाववण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या सोबतच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवण्याचादेखील सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत एमआयएमच्या युतीबाबतच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, त्यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य करत हा कट असून तो उधळून लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधक विरोध करत राहणार पण तितक्याच ताकदीने आता आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे असेही ठाकरे यावेळी सांगितले. (CM Udhav Thakare Reaction On MIM Alliance )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT