Ramdas Kadam VS Anil Parab google
महाराष्ट्र बातम्या

Yogesh Kadam Accident : अपघातप्रकरणी रामदास कदम यांना घातपाताचा संशय; अनिल परबांचं नाव घेऊन म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा मुलगा आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल रात्री 11 च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई हद्दीत अपघात झाला.

अपघातात सुदैवाने योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र अपघातासंबंधी संशय व्यक्त केला जात आहे. रामदास कदम म्हणाले की, योगेश कदम यांच्या गाडीच्या मागे एक आणि पुढे एक पोलिसांची गाडी होती. तरीही नेमकी योगेश कदम यांच्याच गाडीला डंपरने धडक दिली. हे संशयास्पद असून घातपातची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रामदास कदम यांनी घातपाताचा संशय व्यक्त करतांना थेट अनिल परबांचं नाव घेतलं. ते म्हणाले की, अनिल परब यांच्यासारख्या लोकांनी योगेश कदम यांना राजकारणातून संपण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होता काय? असा संशय निर्माण होतोय. ज्यांनी यापूर्वी योगेशदादांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच संशय असल्याचं रामदास कदम म्हणाले.

अपघातानंतर सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. या अपघातानंतर धडक देणारा ट्रकर पलटी झाला. त्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

IND vs PAK, Asia Cup: 'पाकिस्तान नाही, पोपटवाडी संघ', गावसकर भारताच्या विजयनंतर थेटच बोलले

Viral Video : तरुणीने क्षणात संपविले जीवन; लोकांनी खूप समजावलं पण कोणाचंच ऐकलं नाही, हृदयद्रावक व्हिडिओ

Education News : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: आता ५२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार ‘टीईटी’ परीक्षा

Ghati Hospital: एमडी एमएस’च्या ८५ जागा वाढणार; ‘घाटी’त रुग्णसेवेला मिळेल बळकटी, तज्ज्ञ होण्याची संधी

SCROLL FOR NEXT