Antigen 
महाराष्ट्र बातम्या

"या' जिल्ह्यात वाढली "अँटिजेन'मुळे रुग्णसंख्या ! मात्र मृत्यूदर आला दहावरून 5.5 टक्‍क्‍यांवर 

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउनच्या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर घटविण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. सोलापूरचा मृत्यूदर काही दिवसांपूर्वी सुमारे 10 टक्के होता. वाढविलेल्या रॅपिड अँटिजेन चाचण्या आणि त्वरित करण्यात आलेल्या उपचारांमुळे तो आता 5.5 टक्‍क्‍यांवर आला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 17 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाउन जाहीर केला होता. या लॉकडाउनच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, लॉकडाउनच्या कालावधीत टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले. 1 ते 27 जुलै या कालावधीत सुमारे 33 हजार 870 चाचण्या केल्या. या चाचण्यांतून पाच हजार 701 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या. लॉकडाउन कालावधीत 12 हजार 146 रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या. या वाढलेल्या टेस्टमुळे उपचारासाठी आवश्‍यक असणारी आरोग्य व्यवस्थाही विकसित केली. सध्या जिल्ह्यात कोव्हिड केअर सेंटरमध्ये चार हजार 664, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये तीन हजार 499 आणि डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तीन हजार 499 बेडची क्षमता विकसित करण्यात आली आहे. 

गंभीर रुग्णांवर नामवंत डॉक्‍टरांकडून उपचार करता यावे यासाठी टेलि-आयसीयू प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, पुणे येथील डॉक्‍टरांचा सल्ला घेता येणार आहे. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या हायस्पीड डाटा लाइनची व्यवस्था करण्यात आल्याचेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध ठिकाणी उभारण्यात येणारी कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटलसाठी पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण तीन हजार 824 पदांची भरती केली जाणार आहे. केटरिंग कॉलेजमध्ये असलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये योगासने, प्राणायाम, संगीत यांचाही उपचारासोबत वापर केला. तिथे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. समुपदेशक नेमण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनच्या कालावधीत सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजूंना सुमारे 36 हजार फूड पाकिटांचे वितरण केल्याचेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: घाणीत राहायचे की विकास हवा, हे नागरिकांनी ठरवावे : प्रकाश आंबेडकर, वंचितच्या हाती सत्ता द्या!

Post Office FD : बँक नाही, तर पोस्ट ऑफिसची FD ठरतेय फायद्याची; रेपो दराच्या कपातीनंतरही देते 7.5% पर्यंत व्याज

Vijay Hazare Trophy Schedule: रोहित शर्मा, विराट कोहली यांना खेळताना Live कुठे पाहता येणार? समोर आलं वेळापत्रक

Kolhapur Cheating Case : मुंबईमध्ये पोलिस अधिकारी आहे, ‘महसूल’ खात्यातील नोकरी देतो; कोल्हापुरातील एकाची आयुष्याची कमाई लुटली अन्...

RTE Admission 2026: खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार; मुलांचे वय किती असावे? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT