Eknath Shinde on Uddhav Thackeray Resignation esakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर बंडखोर शिंदेंचे पहिलेच ट्विट

धनश्री ओतारी

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Uddhav Thackeray resignation as Chief Minister) द्यावा लागला. बुधवारी उशीरा रात्री ठाकरेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर, एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) पहिल्यांदाच प्रतिक्रीया व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान,भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका. असे शिंदे यांनी ट्विट करत स्पष्ट केलं. (Eknath Shinde on Uddhav Thackeray Resignation)

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान, मंत्रिमंडळ कशा प्रकारे असेल याची देखील चर्चा सुरू आहे.

एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका असे खुद्द एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pub Raid : पुण्यात पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्री? मनविसे ने बंद पाडली फ्रेशर्स पार्टी, अर्ध्या रात्री नेमकं काय घडलं?

Pune Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'येलो अलर्ट'

Latest Marathi News Updates : पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

SCROLL FOR NEXT