Anandraj Ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेस प्रवेशाचे 'ते' वृत्त खोटे, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार : आनंदराज आंबेडकर

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन काँग्रेसला जेरीस आणणार्या प्रकाश आंबेडकर यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या बातमीने सगळ्याचीच झोप उडविली. मात्र 'ती' बातमी खोटी असून असे वृत पसरविणाऱ्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस-आघाडीबरोबरील बोलणे फिसकटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात स्वतंत्रपणे लढण्यास प्राधान्य दिले. राज्यातील बहुतांश जागांवर आपले उमेदवार देऊन आणि लाखोच्या सभा घेऊन वंचितने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पोटात गोळा आणला. आघाडीला वंचितचा फटका कुठे आणि कसा बसेल याचा मोठ्या प्रमाणात ऊहापोह झाला.

दरम्यान इंदु मिल प्रकरणातुन राज्यभर चर्चेत आलेलेल आणि रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातुन आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र आपले बंधु प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यास प्राधान्य दिले. त्याचे रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी आणि राज्यातील दलित समाजाने जोरदार स्वागत केले. आनंदराज यांनी निवडणुक प्रचारात सक्रिय होऊन प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजनच्या अन्य उमेदवारांसाठी राज्यभरात ठिकठिकाणी सभा, बैठका घेतल्या.मतदारांशी थेट संवाद साधला.

राज्यात काँग्रेसला दूर ठेवून आपली ताकद दाखवुन देत असतानाच रविवारी सकाळी त्यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेस प्रवेश केल्याच्या बातम्या सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल झाल्या. त्यामुळे वंचित बहुजनसह रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्तेमध्ये एकच गोंधळ उडाला, मात्र दिल्लीतुन व्हायरल झालेले ते वृत्त खोटे असून अशा बातम्या पसरविणार्याविरुद्ध कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे रिपब्लिकन सेनेने ठरविले आहे. 

दरम्यान, रिपब्लिकन सेनेच्या दिल्लीतील पदाधिकार्यानी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे व सोशल मिडियावर झपाटयाने व्हायरल झाले. या प्रकारामुळे राज्यतील रिपब्लिकन सेना, वंचितच्या कार्यकर्तेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. त्यावरून आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी थेट शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.

आनंदराज आंबेडकर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतच्या बातमीचे स्वत:आनंदराज आंबेडकर यांनी खंडण केले. तसेच दिल्लीतील ज्या पदाधिकारी व कार्यकर्तेनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

 "मी आठ दिवसापासून मुंबईत आहे. दिल्लीला गेलो नाही, मात्र आज सकाळी माझ्या काँग्रेसप्रवेशाबाबतची बातमी पाहुन मलाच धक्का बसला. या प्रकाराचा मी तत्काळ निशेष नोंदविला. दिल्लीत काँग्रेसप्रवेश करणारी कार्यकारिणी मी तत्काळ बरखास्त केली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त खोटे आहे. तसेच हे वृत्त कोणी पसरविले, यामागे नेमके कोण आहे याची चौकशी करुन संबंधीत वृत्तपत्राविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे."
- आनंदराज आंबेडकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor killed in Tilari : आंध्रप्रदेशातील डॉक्टरचा तिलारीच्या जंगलात खून! दरीत मोटार फेकली; खुनामागचं कारण...

AUS vs IND: रोहित...कोहली... चाहत्यांचा जयघोष! सिडनी वनडेपूर्वी अन् नंतर कसं होतं संपूर्ण वातावरण, BCCI ने शेअर केला Video

Latest Marathi News Live Update : संत गोरोबाकाकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

अप्पीला मिळाला तिचा रियल लाईफ अर्जुन ! आज पार पडला साखरपुडा; निवेदिता सराफांची खास हजेरी

रील्स प्रेमींसाठी खुशखबर! Instagram ने लॉन्च केलं मजेदार फीचर, आधी बघितलेली कोणतीही रील सेकंदात सापडणार, काय आहे Watch History सेटिंग?

SCROLL FOR NEXT