Road Accident stats 72 of bikers killed in road accidents across Maharashtra were helmetless  
महाराष्ट्र बातम्या

Road Accident Deaths : रस्ते अपघातात ७२ टक्के गेला लोकांचा जीव; हेल्मेट न घालणे पडले महागात!

सकाळ डिजिटल टीम

रस्ते अपघातात दररोज शेकडो लोकांचा जीव जातो. यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांपैकी किमान ७२ टक्के चालक हे हेल्मेट न घतलेले होते. राज्य परिवहन विभागाच्या २०१९ ते २०२१ च्या ताज्या अपघातासंबंधीच्या माहिती विश्लेशणातून ही बाब समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये महाराष्ट्रातील ६९ टक्के दुचाकी चालक (३,४०३) आणि ७९ टक्के दुचाकीवर मागे बसलेले लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. यासोबतच दुचाकी अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण २०२१ मध्ये २०१९ च्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. तर मुंबईत ४० टक्के रस्ते अपघातात जीव गमवणारे ४० टक्के बळी हे दुचाकीस्वार होते असे आकडेवारीतून दिसून आले आहे. 'द टाइम्स ऑफ इंडीया'ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबई आणि उर्वरित राज्यातील सर्व डीलर्सना दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट देणे सक्तीचे केले आहे. असे असूनही हेल्मेट घालण्याचे अनेकदा आवाहन करून देखील दुचाकीस्वार हे या हेल्मेट घालण्याच्या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT