Rohit Pawar agitation for MIDC at Karjat Jamkhed Uday Samant promises to hold a meeting Assembly monsoon Session  
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar News : कर्जत-जामखेडच्या MIDCसाठी रोहित पवार एकटेच भिडले! अखेर उद्योगमंत्र्यांनी दिलं 'हे' आश्वासन

रोहित कणसे

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवशेन सुरू असून यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी आंदोलन सुरू केलं होतं. मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ ते एकटेच आंदोलनाला बसले. दरम्यान यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी त्यांची समजूत काढत त्यांना आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी आंदोलन मागे घेतलं.

रोहित पवारांची भेट घेतल्यानतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, रोहित पवार यांनीत्यांच्या मतदारसंघात एमआयडीसी साठी आंदोलन सुरू केलं होतं, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार उद्याच उद्योग विभागाकडून कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी बैठक घेतली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.

यासाठी जी अधिसूचना काढावी यासाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. रोहित पवारांनी माझ्या विनंतीला मान दिला आहे. सरकार एमआयडीसाठी सकारात्मक अधिसूचना लवकरात लवकर काढली जाईल आणि त्यासाठी उद्या बैठक घेतली जाईल असे उदय सामंत म्हणाले.

उद्योगमंत्री सामंत यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की माझ्या मतदारसंघात रोजगाराच्या अडचणी सुटव्या म्हणून आज आंदोलन केलं. गेल्या वर्षभरात अनेकवेळा उदय सामंत, मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो.

मागे काय झालं त्यात न जाता आज अनेक नेते येऊन भेटले. उदय सामंत साहेब यांनी येऊन उद्या बैठक घेण्याचा शब्द दिला आणि अधिवेशन संपण्याअगोदर अधिसूचना काढणार असाही शब्द दिला.

महाराष्ट्राचे मंत्री म्हणून विश्वास ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझं आंदोलन मागे घेतोय, असे रोहित पवार म्हणाले. जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झालं नाही तर, माझ्यासह माझ्या मतदारसंघातील अनेक आमदार मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT