Rohit Pawar News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : राज्यातील ६० आमदारांबाबत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा

महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशातच सत्ताधारी पक्षाच्या 60 आमदारांचा दरमहा खर्च हा 12 कोटी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. (Rohit Pawar News)

अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावा ट्वीटद्वारे मांडला आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडे सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. तर “सत्ता पक्षातील जवळजवळ 60 आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा लागत असेल तर या राज्यात खरंच कायदा व सुव्यवस्था चांगली आहे का?”, असा प्रश्न धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT