RSS chief Mohan Bhagwat esakal
महाराष्ट्र बातम्या

Dasra Melava : संपूर्ण जग आता भारताचं ऐकतंय, देशाचं वजन वाढलंय - मोहन भागवत

महिलांना घरात बंद ठेवणं योग्य नाही. मातृशक्तीला सशक्त बनवण्याची आवश्यकता आहे.

सकाळ डिजिटल टीम

महिलांना घरात बंद ठेवणं योग्य नाही. मातृशक्तीला सशक्त बनवण्याची आवश्यकता आहे.

नागपूर : महिलांना घरात बंद ठेवणं योग्य नाही. मातृशक्तीला सशक्त बनवण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या सहभागाशिवाय कोणतीही संघटना उभी केली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट मत आरएसएस प्रमुख मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं. नागपुरात ते दसरा मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत विजयादशमीच्या (Vijayadashami) सभेत म्हणाले, सत्ता हाच प्रत्येक गोष्टीचा आधार आहे. शक्ती हा शांती आणि शुभचा आधार आहे. चांगलं काम करण्यासाठी शक्ती लागते, असं ते म्हणाले. आरएसएसनं आज विजयादशमीनिमित्त नागपूर रेशम बागेत रॅलीचं आयोजन केलं आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत विजयादशमीच्या सभेला संबोधित करत आहेत.

भागवत पुढं म्हणाले, मातृशक्तीकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपण महिलांना जगाची माता मानतो, पण त्यांना पूजाघर किंवा घरांत कोंडून ठेवलं आहे. परकीय हल्ले संपल्यानंतरही त्यांना निर्बंधातून स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काम करू शकतात. मातृशक्ती जागृत करण्याचं काम आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

जगात आता भारताचं ऐकलं जात आहे. आपलं वजन वाढत आहे. श्रीलंकेच्या संकटात आम्ही खूप मदत केली. युक्रेन-रशिया युध्दादरम्यान आमची मोठी होती. यामुळं आम्हाला अभिमान वाटतोय. क्रीडा क्षेत्रातील धोरणांमध्येही चांगली सुधारणा झालीय. आमचे खेळाडू ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकत आहेत. कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्थाही सुधारत आहे. काळानुसार सगळं काही बदलत आहे. आपल्या देशात कलह, अराजकता, दहशतवाद वाढत आहे. त्यामुळं सावध राहण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

आज सकाळी RSS नं शहरात पथसंचलन आयोजित केलं होतं. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून चार हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला संतोष यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. आरएसएसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT