Rupali Chakankar gives a strong and bold reply to critics targeting her character during political controversy.
esakal
Rupali Chakankar’s Strong Reply to Critics :राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘साप्ताहिक सकाळ’च्या ‘कॉफी कोलॅब’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने आणि स्पष्टपणे उत्तरं दिली. तसेच, त्यांच्यावर सोशल मीडियातून वैयक्तिक पातळीवरील टीका-टिप्पणी करणाऱ्यांनाही कडक शब्दांत उत्तर दिले.
या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘’माझा सुरूवातीपासूनचा प्रवास आपण सर्वांनी बघितलेला आहे. मी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि आयोगाची अध्यक्ष असा माझा २० वर्षांचा राजकीय प्रवास आहे. यामध्ये सुरुवातीला अशा पद्धतीच्या कमेंट्स कधीच येत नव्हत्या. मात्र जससशी प्रगती होत गेली, पदं वाढत गेली. तशी कमेंट करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. या ज्या कमेंट असतात त्या अतिशय खालच्या पातळीवरील असतात.’’
‘’लोकांनी तुम्हाला सुरुवातीपासून पाहिलेलं आहे. मी ना वडिलांच्या नावावर येऊन खुर्चीवर बसलेले आहे, ना नवऱ्याच्या नावावर. ते कुणीही राजकारणातील नाही. सासूबाईंचं निधन झाल्यानंतर माझं राजकारण सुरू झालं. त्यामुळे या सगळ्या प्रवासात सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी संघटनेच्या माध्यमातून असतील किंवा त्या पदावर काम करत असताना, जसं चिमणी काडीकाडी गोळा करून घरटं बांधते, तसं आम्ही एक एक माणूस जोडून काम करत आलो. २० वर्षांच्या प्रवासानंतर जर इथपर्यंत पोहचलो असेल तर ती त्या कामाची पावती आहे. शासानाने देखील मला दुसऱ्यांदा आयोगाची अध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी दिली, ही माझ्या कामाची पावती आहे, यामागील प्रवास फार मोठा आहे. कुटुंबाला अक्षरशा वाऱ्यावर सोडावं लागतं.’’
’’इथपर्यंत आल्यानंतर ज्या पद्धतीने एखादी कमेंट कुणी केली आणि ती चारित्र्यावर केली जाते. दिसण्यावर-असण्यावर केली जाते. असणं आणि दिसणं हा त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो, त्यावर सुद्धा बोललं जात असेल तर मी असं समजते, म्हणजे जेव्हा माझ्या साडीवर टीका होते त्यापेक्षा मला ती भावना त्यांचा वैयक्तिक द्वेष वाटतो. कारण, हा माझा वैयक्तिक विषय आहे. मग जर तुम्ही माझ्या साडीवर आणि टिकलीवर बोलत असाल, तर मला असं वाटतं की त्या समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तिची वैचारिक पातळीही तितकीच आहे.’’
‘’तुम्ही वैचारिकदृष्टीने बोला, माझ्या कामावर प्रश्न विचारा, माझ्या आयोगावर प्रश्न विचारा मी त्यावर उत्तर देईन. पण न विचारता तुम्ही साडीवर बोलताय याचा अर्थ तुमची मानसिकाताच तेवढी आहे. तुमच्यातील तो न्यूनगंड दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. तुमच्यात तुमचं असणाचा आत्मविश्वास नाही, म्हणून तुम्ही माझ्या दिसण्याच्या आणि असण्याबाबत बोलताय.’’
‘’सुरुवातीला याचं वाईट वाटायचं, पण नंतर असं लक्षात आलं की ही ती लोक आहेत, ज्यांच्या डोक्यात मेंदूचा अभाव असू शकतो, विचारांचा अभाव असू शकतो. वैचारिक बैठक असू शकत नाही. आणि यात काही लोकांनी ठरवून म्हणजे पेमेंट करून हे सगळं चालवलेली यंत्रणा आहे आणि माझ्याकडे तसे पुरावे सुद्धा आहेत. ही ट्रोल आर्मी आहे, एखाद्या महिलेसंदर्भात अश्लील व्हिडिओ बनवणं, कुणाबरोबर तरी नाव जोडणं, एखाद्या इमेजवर त्या पद्धतीने बोलणं इतकं ते काम करू शकतात. कारण, त्यांना कळलेलं असतं की समोरच्या व्यक्तिला आपण कोणत्याच शस्त्राने हरवू शकत नाही, तिचा कुठचं पराभव करू शकत नाही. मग सगळे पर्याय संपले की शेवटचा पर्याय असतो तो म्हणजे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.