Sachin Sawant on Chandrakant Patil | Kolhapur News esakal
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांतदादा तुम्हाला चिंता असण्याचे कारण नाही - सचिन सावंत

बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

स्नेहल कदम

बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

सध्या कोल्हापुरात राजकीय वारे वेगाने वाहताना दिसत आहेत. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडी आमनेसामने आले आहेत. यामध्ये भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळत आहे. काल दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करत असताना पक्षाच्या बड्या नेत्यांनी मात्र एकमेकांवर चांगलेचं ताशेर ओढले आहेत. भाजपाच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर 'बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस', असं म्हणत निशाणा साधला. आता त्यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसकडून टीका होत आहे.

यासंदर्भात कॉंग्रेसचे सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एक ट्विट करत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. 'बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस' या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर ते म्हणतात, पण मग चंद्रकांत दादा तुम्हाला चिंता असण्याचे कारण नाही. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवार पाडण्यासाठी चंद्रकांतदादांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसला असा हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, तुम्ही ज्या पक्षाचे आहात, त्याचे नेते कुठे आहेत ते शोधावं लागतं. सेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. अस्वस्थ झाल्याने निवडणुकांमध्ये त्यांचा रोष बाहेर निघणारच आहे. यावर संजय राऊत म्हणतील, आमच्या घरातलं आम्ही बघतो. पण तुमच्या घरात काय चाललंय ते दररोज दिसतंय. सकाळ संध्याकाळ टीव्ही लावल्यानंतर कळतंय सगळं, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT