sadabhau khot google
महाराष्ट्र बातम्या

NCPचे कार्यकर्ते आक्रमक, केतकी चितळे समर्थनात सदाभाऊंचा यू-टर्न

केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत खोत यांनी तिचे समर्थन केले होते

सकाळ डिजिटल टीम

केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत खोत यांनी तिचे समर्थन केले होते

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेचं रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून सदाभाऊ यांच्यावर टीका करण्यात आली. तुम्ही इतरांवर बोलता तेव्हा तेव्हा तुमची नैतिकता कुठे जाते? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला होता.

दरम्यान, या वादात उडी घेतल्यानंतर आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंगावर धावून जात असताना सदाभाऊंनी अचानक यू-टर्न घेतला आहे. केतकी चितळेचं मी समर्थन केलंच नाही, असा दावा त्यांनी केला आहे. सदाभाऊ खोत काल (16) सोलापूर दौऱ्यावर होते. केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत खोत यांनी तिचे समर्थन केले होते. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होत सदाभाऊंच्या अंगावर धावून गेले होते. यानंतर सदाभाऊ खुलासा करत म्हणाले, मी केतकीच्या पोस्टचं समर्थन केलेलं नाही. तर न्यायालयात खंबीरपणे उभी राहिली याचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

केतकी चितळे ही कणखर आहे. कारण कोर्टात कुठलाही वकील न देता तीनं एकटीनं आपली बाजू मांडली. त्यामुळं तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. केतकीच्या पोस्टवर तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या, हे धंदे आता बंद करा. सरकार पुरस्कृत दहशतवाद तुम्ही राज्यात वाढवत आहात का? तुमच्या पोलिसांवर तुमचा विश्वास नाहीये का? दुसऱ्या बाजूला या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय पदव्या दिलेल्या होत्या. यावेळी कुठे गेली ती नैतिकता?, असे सवालही त्यांनी केले होते.

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजप प्रवक्त्यांना मारतानाचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मैदानात उतरले आहेत. प्रधान यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा दिवाळी सेलिब्रेशनसाठी केलं 'मॅचिंग मॅचिंग'; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण

Diwali Celebration : वसई विरार मध्ये शिवरायांच्या किल्ल्याचे दर्शन; ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत इतिहास कालीन किल्ले

Balipratipada and Padwa 2025: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Fursungi Nagar Parishad Election : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

SCROLL FOR NEXT