sadabhau khot criticism on rahul gandhi ESakal
महाराष्ट्र बातम्या

रात्री झोपून देश समजत नाही, त्यासाठी... ; सदाभाऊंचा टोला

...आणि खरं देशप्रेम तेव्हाच उफाळून येतं-सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

रात्री झोपताना देशाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो.सकाळी उठल्यावर एखाद्या प्रियकरासारखं मी देशावर प्रेम करतो अस कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका कार्यक्रमा दरम्यान वक्तव्य केलं या वक्तव्याचा समाचार रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी घेतला आहे. रात्री झोपून देश समजत नाही, त्यासाठी आयुष्य खर्ची घालवावं लागतं असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधीच्या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ खोत म्हणाले, रात्री झोपून देश समजत नाही त्यासाठी दिवसरात्र एक करुन संपूर्ण आयुष्य खर्ची घालवावं लागतं. आणि खरं देशप्रेम तेव्हाच उफाळून येतं असा टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले राहुल गांधी

असे अनेक नेते आहेत जे सकाळी उठल्याबरोबर सांगतात सत्ता कशी मिळणार. असे म्हणत रात्रीपर्यंत झोपी जातात. सकाळी उठून सत्ता कशी मिळवायची ते सांगतात. मात्र, माझा जन्म सत्तेच्या घरात झाला. परंतु मला सत्तेचा मोह अजिबात नाही. मी कुठलाही गैरव्यवहार केला नाही, त्यामुळेच आज तुमच्या पुढे भाषण करताना ताठ मानेने उभा आहे. मी सतत देशाच्या प्रगतीचा विचार करीत आलो आहे असे राहुल गांधी दिल्लीत कार्यक्रमादरम्यान भाजप सरकारवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Goa Konkan : मॉन्सून गोवा, कोकण किनारपट्टीवर दाखल? राज्यात ४ दिवस वादळी पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा पत्ता कट? जागेसाठी राष्ट्रवादीत नव्या 'या' ४ नावांची चर्चा; महायुतीचा '१२-३-२' फॉर्म्युला काय?

Mumbai Indians: रोहित शर्मा RR विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जयवर्धनेने दिले अपडेट्स, संघाच्या अपयशाचं कारणही सांगितलं

ICC New Rule: चेंडूचा रंग बदलणार, गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीमला रणनीती सांगायला येणार; क्रिकेटमध्ये नव्या बदलाचे संकेत

Petrol-Diesel Price: GST लागू झाल्यास पेट्रोल-डिझेल किती स्वस्त होऊ शकतं? जाणून घ्या धक्कादायक गणित

SCROLL FOR NEXT