sakal maratha samaj  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा समाज पुन्हा आक्रमक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला इशारा

राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक

रुपेश नामदास

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदर याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आलेली होती.

राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून हा सरकारला धक्का बसला आहे. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता राज्यात पुन्हा संघर्ष पाहिला मिळणार आहे.

मराठा समाजाने आता थेट तुळजापूर ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महामोर्चाच्या निमित्ताने एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा गुंजणार आहे. तसेत मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देखील देण्यात आला आहे.

आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवला अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय पूजा करू देणार नाही असा पवित्रा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज आक्रमक झाला आहे. सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या वतीने पंढरपुरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाची याचिका राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्यामुळेच फेटाळण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. समाजाच्या वतीने तुळजापूर ते मुंबईपर्यंत मोर्चा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत एल्गार पुकारणार आहे.

एक महिनाभर मराठा समाजाचे कार्यकर्ते तुळजापूर ते मुंबई मंत्रालय पायी यात्रा काढणार आहेत. 6 जूनला मुंबईमधील आझाद मैदानावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार असल्याची भूमिका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

tv9 मराठीच्या वृत्तानुसार..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT