uddhav thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: राष्ट्रवादीतील अनेक नेते कुंपणावर! शरद पवारांनी दूर केलं मळभ; ठाकरे गटानं मांडली भूमिका

शिवसेनेसारखी अवस्था नको म्हणून पवारांनी जनमानस तपासल्याचंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडल्यानंतर राज्यात बरीच खळबळ माजली आहे. पण त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करताना पवारांनी मळभ आणि हवा स्वच्छ केली अशा शब्दांत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं आपली भूमिका मांडली आहे. सामनातील अग्रलेखातून पवारांच्या निर्णयावर सडेतोड भाष्य करण्यात आलं आहे. (Samana agralekh Uddhav Thackeray Sanjay Raut Sharad Pawar resigns Shivsena stand on NCP)

राज्यातील अनेक नेते सध्या कुंपणावर आहेत यांपैकी बरेच जण राष्ट्रवादीचे आहेत. या कुंपणावरील नेत्यांनीच पवारांच्या राजीनाम्यानंतर सर्वाधिक विलाप केल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. पण शरद पवारांनी पक्षातील मळभ दूर करताना या कुंपणावरील लोकांचे मुखवटे ओरबाडून काढल्याचंही म्हटलं आहे.

राष्ट्रवादीतील अंतर्गत विषय असला तरी पवार ह या घडामोडींचे नायक आहेत राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष होईपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरु राहतील. शरद पवार राजकारणातील भीष्म आहेत, त्यामुळं शरपंजरी पडलेले नसून सूत्रधार आपणं असल्याचं पवारांनी नेमकेपणानं दाखवून दिल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसेनेसारखी अवस्था नको म्हणून पवारांनी जनमानस तपासलं

शिवसेनेसारखी अवस्था नको म्हणून शरद पवारांनी जनमानस तपासून पाहिलं आहे, असा सूरही या अग्रलेखातून दिसतो. शिवसेना फुटली, चाळीस आमदार सोडून गेले. पण संघटन व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार गेले तरी जिल्हा पातळीवरील फळी आपल्यासोबतच असावी यासाठी हा जनमानस तपासण्याचा धक्का प्रयोग असू शकतो.

अजित पवारांचं अंतिम ध्येय मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना काळजी घ्यावी लागेल. अजित पवारांचं अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यंमत्री व्हायचं आहे. तर सुप्रिया सुळेंचा देशपातळीवर संपर्क चांगला पण वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT