Sambhaji Brigade appeals to Raj Thackeray over rajmudra on cricket bat
Sambhaji Brigade appeals to Raj Thackeray over rajmudra on cricket bat  
महाराष्ट्र

राजमुद्रेची विटंबना थांबवा...; संभाजी ब्रिगेडची राज ठाकरेंना अवाहन

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे चर्चेत आहेत, यातच मनसेकडून राजमुद्रा कोरलेल्या क्रिकेट बॅट वाटल्या जाणार आहेत, यावरून राजमुद्रेच्या विटंबनेचा मुद्दा समोर आला आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) ने एक पत्रक जारी करत राजमुद्रेची विटंबना थांबवण्याची मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसे कडून ५०० बॅटचे वाटप होणार आहे. यामध्ये बॅटवर राजमुद्रा कोरलेली आहे. आता त्याच बॅटने मुलं खेळणार आणि राजमुद्रेची वारंवार विटंबना होणार.

मागील वेळी मनसेच्या एका सभेतील फोटो व्हायरल झाले होते. त्यात मनसेचे झेंडे स्टेजच्या खाली टाकलेले होते. ते फोटो पोस्ट करताना देखील बरोबर वाटत नव्हते. मनसेचे आणि माझे मतभेद आहेत, परंतु राजमुद्रा हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. तिची अशा पद्धतीने पक्षाच्या नावावर केली जाणारी हेळसांड योग्य नाही. राजमुद्रा हा राजकीय भांडवलाचा विषय नसून तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा मानबिंदू आहे. मनसेमध्ये असलेले माझे मित्र याचा विचार करतील ही अपेक्षा आहे, असे संभाजी असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.

पुढे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत, राज ठाकरे छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर पक्षाचा लोगो म्हणून हिंदुत्वासाठी अन् दंगली पेटवण्यासाठी करणार का आता.? संदेश तर तसाच मिळतोय. स्वराज्याची राजमुद्रा टीनपाट पक्षाची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही, असे देखील म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT