Sambhaji Raje  
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजेंची पत्नीसाठी भावनिक पोस्ट, तेव्हा माझ्या मागे...

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्नीसंदर्भात लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्नीसंदर्भात लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट संभाजीराजे यांनी शेअर केली आहे.(Sambhaji Raje Chhatrapati facebook post Wife Sanyogita Raje Chhatrapati Birthday )

या फेसबुक पोस्टमध्ये संभाजीराजेंनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे साथ देणाऱ्या आपल्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्यावर कौतुकाचा वर्षावर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संयोगिताराजे छत्रपती या नेहमीच प्रत्येक आघाडीवर संभाजीराजे यांना साथ देताना दिसतात. गेल्यावर्षी आझाद मैदानावर संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण केले होते. तेव्हादेखील संयोगिताराजे आपल्या पतीसोबत शेवटपर्यंत ठाण मांडून होत्या.

Hasan Mushrif : मुश्रीफांच कोलकत्ता कनेक्शन? मोठी अपडेट

संभाजीराजेंची पत्नीसाठी भावनिक पोस्ट

माझ्या जीवनाशी एकरूप होऊन, प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या अ. सौ. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस !

महिन्यातील बहुतांश दिवस स्वराज्य संघटना विस्ताराच्या व विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरत असतो, तेव्हा माझ्या मागे त्या संपूर्ण परिवाराची काळजी घेतात. परिवारासोबतच कार्यकर्त्यांचीही त्या काळजी घेतात.

कुठेही माझी अनुपस्थिती जाणवू देत नाहीत. ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक महोत्सव असो वा दिल्लीतील शिवजयंती असो, सर्व कार्यक्रमांमध्ये हिरीरीने पुढाकार घेऊन अत्यंत सूक्ष्म नियोजन करून कोणताही कार्यक्रम विना अडथळा यशस्वी करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे.

CM Shinde : सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या

सर्वांना सोबत घेऊन, सर्व बारकावे टिपून परिपूर्ण नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे कोणताही कार्यक्रम विनासायास व शिस्तबध्दरित्या संपन्न होतो.

त्यांच्या या सहर्ष योगदानामुळे माझा खूप मोठा ताण कमी होतो व सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे मी निर्धास्त राहू शकतो.

आजवर जीवनात आलेल्या प्रत्येक चढउतारामध्ये त्यांनी मला खंबीरपणे मला साथ दिली. प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देवून सतत मला पाठबळ देण्याचं कार्य त्या करत असतात. त्यांना आरोग्यमय दिर्घायुष्य लाभो हिच जगदंबे चरणी प्रार्थना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Raju Shetti Protest : कोल्हापुरात राजू शेट्टी समर्थक आणि पोलिसांत झटापट; राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्यावर पोलिसांचा बळाचा वापर

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT