महाराष्ट्र बातम्या

संभाजीराजेंची राज्यसभेच्या लढतीतून माघार? समीकरण न जमल्याने 'दिल्ली' दूर

सकाळ डिजिटल टीम

येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. (Sambhaji Raje Chhatrapati)

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीनेही सुरुवातीच्या काळात छत्रपतींना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. मात्र, यावरून यूटर्न घेत शिवसेनेला पाठिंबा दिला. (Sanjay Raut On Rajyasabha)

सेनेने छत्रपतींना शिवबंधन बांधण्याची ऑफर दिली होती. मात्र राजेंनी ती धुडकावल्याने राज्यसभेचा मार्ग त्यांच्यासाठी अवघड झाला. अखेर सेनेने कोल्हापुरातूनच जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देत खेळी केली. आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.

संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून माघार घेण्याीची शक्यता वाढली आहे. सकाळीच त्यांनी ट्वीट करत माझी बांधिलकी जनतेशी असल्याची पोस्ट केली. यानंतर चर्चा वाढल्या आहेत. मविआच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढावल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपने देखील त्यांना जाहीर समर्थन दिलेलं नव्हतं. त्यामुळे दिल्लीसाठी आकड्यांची समीकरणं जुळवताना संभाजीराजेंना कसरत करावी लागली. (Sambhaji Raje Chhatrapati on Rajyasabha)

अखेर संभाजीराजे यांनी या लढतीतूनच माघार घेणार असल्याचं कळतंय. सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीराजे काही वेळात भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, आकडेवारीचं राजकारण जूळवून आणण्यात संभाजीराजेंना यश न आल्याने ते माघार घेणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, संजय राऊत आणि संजय पवार यांनी त्यांचे राज्यसभेचे अर्ज दाखल केले आहेत. उद्या संजय राऊत थेट कोल्हापुरात जाऊन कार्यर्त्यांची भेट घेणार आहेत. तर शनिवारी राऊत यांची सभा पार पडणार आहे.

सेनेची ऑफर आणि पवारांची खेळी...भाजपचा सस्पेन्स

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर करताच शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडून जाहीर पाठिंबा देत खेळी केली. यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यानी यू टर्न घेतला. शिवसेनेने राजेंना पक्षप्रवेश करण्याची ऑफर दिली. यातून राजकारण आणखी वेगळ्या वळणावर गेलं. सहावी जागा भाजपच्या गोटातून रिक्त होत आहे.

विकास महात्मे यांच्या जागी चाचपणी सुरू होती. मात्र भाजपला संख्याबळाचं समीकरण साधण्यात घाम गाळावा लागणार असल्याने महाविकास आघाडीला त्यामध्ये सरशी मिळणार आहे. यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या. शिवसेनेकडे मविआ सरकारमधील सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागेवर सेनेचा नेता जाणार असल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

Kolhapur Auto Rickshaw Drivers Protest : 42 रुपयांचा एलपीजी गॅस 80 रुपये कसा झाला? दरवाढीवरून रिक्षाचालकांचा एलपीजी गॅस पंपाला घेराव

SCROLL FOR NEXT