Sambhajiraje on politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhajiraje : चळवळीत काम करुन थकलोय, आता पुढचा निर्णय...; संभाजीराजेंनी जाहीर केली भूमिका

संतोष कानडे

नाशिकः एकीकडे आज नाशिकमध्ये भाजपने समर्पण दिनानिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं तर दुसरी संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करुन भूमिका जाहीर केली आहे.

आजपर्यंत चळवळीत काम केलं, चळवळीत काम करुन मी थकलो..त्यामुळे आता निर्णय घ्यावाच लागेल, असं म्हणत संभाजीराजेंनी २०२४च्या अनुषंगाने निर्णय जाहीर केला आहे.

नाशिकमध्ये वाढदिवसानिमित्त संभाजीराजेंच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, मला महाराष्ट्राकडून भरभरुन प्रेम मिळालं आहे. चळवळीत काम करतांना कार्यकर्त्यांवर खटले दाखल झालेले आहेत. आता थांबायचं नाही. आपल्यालाही राजकारणात उतरायचं आहे. स्वराज्य संघटना १०१ टक्के राजकारणात उतरेल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ५२ वर्षांमध्ये पहिल्यांदा माझा वाढदिवस कोल्हापूरच्या बाहेर साजरा होत आहे. सुरतेहून परततांना शिवाजी महाराज आधी नाशिकला आले होते, म्हणून आज नाशिकला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता शिवाजी महाराजांचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागू, २०२४ हे आपलं निश्चित ध्येय असणार आहे, असं संभाजी महाराज म्हणाले.

दरम्यान, संभाजीराजे २०२४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या स्वराज्य संघटनेने राज्यभर उमेदवार दिले तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाला नक्कीच जड गेल्याशिवाय राहणार नाही, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

SCROLL FOR NEXT