Parivartan Kranti By Sambhaji Raje Chhatrapati  
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Raje : 9 ऑगस्टला तुळजापुरातून होणार परिवर्तन क्रांतीची सुरूवात; संभाजीराजेंकडून घोषणा

या महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात ही तुळजापूरपासून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणासाठी समजाला न्याय मिळवून देण्याचा लढा देत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून कामगिरी बजावली आहे. दरम्यान, आता ते महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार आहेत. येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं (Kranti Din) औचित्य साधून या क्रांतीला सुरुवात होणार आहे. संभाजीराजेंनी आज यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा संभाजीराजे अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसणार आहेत. (Parivartan Kranti By Sambhaji Raje Chhatrapati)

ट्वीटमध्ये ते म्हणतात, क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात.. भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला..." असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात ही तुळजापूरपासून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली होती. 12 मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होत. यासोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असंही संभाजीराजे म्हणाले होते.

संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरमधून करण्याला कारण आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंदही ठेवण्यात आलं होतं. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचं ट्वीट केल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलं आहे. संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर इथे नेमकं काय केलं जाणार आहे, याबाबत उत्सुकताही निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT