Sameer-Bhujbal 
महाराष्ट्र बातम्या

'आम्ही चुकीचं केलं नव्हतं', निकालानंतर समीर भुजबळांची सूचक प्रतिक्रिया

'अजून डिटेल ऑर्डर यायची आहे. त्यामुळे जास्त बोलता येणार नाही'

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा (maharashtra sadan scam) प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांना आज मोठा दिलासा मिळाला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) त्यांचा मुलगा पंकज (Pankaj) आणि पुतण्या समीर (Sameer Bhujbal) यांच्यासह चौघांची विशेष न्यायालयाने बुधवारी निर्दोष सुटका केली. या निकालानंतर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"आमच्यावर जे आरोप करण्यात आले होते, ते आम्ही खोडून काढले. प्रत्येक गोष्टीत सत्यता कशी आहे? त्याचे आम्ही पुरावे मांडले. त्याआधारावरच आजचा निकाल लागला आहे. अजून डिटेल ऑर्डर यायची आहे. त्यामुळे जास्त बोलता येणार नाही" असे समीर भुजबळ म्हणाले.

"अनेक वर्षांपासून लढाई सुरु होती. न्याय मिळेल हा विश्वास होता. आम्ही चुकीचं केलं नव्हतं. आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास होता. त्या अनुषंगाने आज न्याय मिळाला" असे समीर भुजबळ म्हणाले. ईडीकडून अजूनही तपास सुरु आहे. सहा प्रकरणे आहेत, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर "सहा प्रकरणाची आम्हाला माहिती नाही. ईडीची एक केस प्रलंबित आहे" असे उत्तर समीर भुजबळ यांनी दिले.

छगन भुजबळ काय म्हणाले?

''महाराष्ट्र सदन हे फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बांधण्यात आलं. गेल्या ८ वर्षांपासून देशातील अनेक पक्ष त्याचा वापर करतात. त्याठिकाणी सर्व फर्निचरसह आपण व्यवस्था केली आहे. ते बांधून दिल्यानंतर १०० कोटी रुपयांचा एफएसआय किंवा जमीन कंत्राटदाराला देऊ, असे सांगितले होते. मात्र, आतापर्यंत कंत्राटदाराला काहीही मिळाले नाही. तरीसुद्धा आमच्यावर आरोप करण्यात आले. ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मीडिया ट्रायल देखील घेण्यात आली. ईडीची कारवाई सुद्धा झाली. शेवटी मला आणि समिरला सव्वादोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. गेल्या वर्षभर सत्र न्यायालयात केस सुरू होती. त्यामध्ये आम्हाला वगळण्यात यावं. त्यात आमचा काही दोष नाही, अशी मागणी आम्ही केली होती. आता न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त घोषित केले. त्याचा आनंद आहे" असे भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT