Sandeep Deshpande News
Sandeep Deshpande News google
महाराष्ट्र

संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढणार? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले होते.

मुंबईत बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांना चकवा देत पळ काढलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांनी काल त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता संदीप देशपांडे (Sandeep Deshpande Mns) आपल्या खासगी गाडीत बसून वेगात निघून गेले. यावेळी झालेल्या गोंधळात एक महिला पोलिस कर्मचारी रस्त्यावर पडली होती. देशपांडे यांच्या गाडीचा धक्का लागल्यानेच सदर महिला पोलिस पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं बोलंल जातं आहे. (Sandeep Deshpande News)

काल या प्रकरणाची दखल राज्याच्या गृहमंत्रालयानेही घेतली होती. देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले होते. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी मुंबई पोलिस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिले असल्याची माहिती देसाई यांनी दिली होती.

मशिदींवरील भोंग्यासंदर्भात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे काल राज्यभर पडसाद उमटले. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी मशिदींमध्ये भोंग्यांविना नमाज झाले. यावेळी काल पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनाही पोलिस ताब्यात घेणार होते. पण राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्ताबाहेरून देशपांडे हे पोलिसांच्या ताब्यातून निसटले होते. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

देशपांडे यांच्या गाडीचा धक्का लागल्यानेच महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. संदीप देशपांडे हे सकाळी शिवतीर्थावर आले होते. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशपांडेही तिथे आले होते. पोलिस त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांनी पोलिसांना चकवा देते तिथून पळ काढला. यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT