mns latest news update 
महाराष्ट्र बातम्या

दुसऱ्यांना पान टपरीवाले म्हणणारे आधी कारकून होते; मनसेचा राऊतांना टोला

जुन्या आठवणींचा पुरावा देत मनसेने खासदार राऊतांना कानपिचक्या मारल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जुन्या आठवणींचा पुरावा देत मनसेने खासदार राऊतांना कानपिचक्या मारल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बदलांचे वारे वाहत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (MNS) दरम्यान, आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (maharashtra politics)

संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला, भाजी विकणारा, वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राज ठाकरे यांनी तुम्हाला 'सामना'चे संपादक बनवलं आहे, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे. (mns latest news update)

दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकारण दिवसेंदिवस तापयला लागलं आहे. खासदार संजय राऊत यांनी यादरम्यान अनेक वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी टीकाही केली आहे. आता मनेसनेही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जुन्या आठवणींचा पुरावा देत मनसेने त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे राऊत आणि मनसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येणार का अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT