MNS Latest News  
महाराष्ट्र बातम्या

राजीनाम्याची स्क्रीप्ट ठरली.., मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

कुठे आणून ठेवलीये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना?, मनसेचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

कुठे आणून ठेवलीये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना?, मनसेचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि शिंदेंच्या बंडाळीने राज्य सरकारला घेरल्याचं स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी यामुळे यशस्वी होत असल्याचं दिसतं आहे. शिंदे गटातील आमदारांच्या संरक्षणासाठी भाजपा सज्ज झालं आहे. (maharashtra politics) शिवसेना उद्या आक्रमक झाली तर भाजपाही देणार जशास तसे उत्तर देण्याची तयारी करत आहे. दरम्यान, आता या सगळ्यात मनसेने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. (sandeep deshpande on cm uddhav thackeray)

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देताच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात की, राजीनाम्याची स्क्रीप्ट ठरली आहे. संभाजी नगरच्या नामांतराचा आव आणायचा आणि आपले हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे. कुठे आणून ठेवलीये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना?, असा खोचक सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसे उद्याच्या बहुमत चाचणीत भाजपाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करणार आहेत. आता मनसेने केलेल्या या टीकेवर सेना काही उत्तर देणार का हे पहावे लागणार आहे. राजकीय वातावरणात बदल आणि घडामोडी घडत असताना मनसेच्या या निर्णयामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

SCROLL FOR NEXT