Sangli Lok Sabha Constituency|Vishal Patil|Vishwajeet Kadam Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Vishwajeet Kadam: "आम्ही कार्यकर्त्यांनी पाच पाच वर्षे मतदारसंघात राबायचे, रस्त्यावर उतरायचे, आंदोलने करायची आणि निवडणूक आली की, जागा दुसऱ्या पक्षाला सोडून द्यायची हे कार्यकर्त्यांना आवडले नाही."

Sandip Kapde

सांगली लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरलेले विशाल पाटील गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यभर चर्चेत आहेत. त्यांच्या अपक्ष उमेदवारीला अनेक नेतेमंडळी पाठिंबा देत असताना आता वंचित बहुजन आघाडीही विशाल यांच्या मागे उभारली आहे.

याच पार्श्वभूमीवर सकाळचे प्रतिनिधी संदीप कापडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याशी बातचीत केली. यावेळी विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय, विरोधी उमेदवार, काँग्रेस पक्ष आणि विशेष म्हणजे डॉ. विश्वजीत कदम यांच्याबाबत भाष्य केले.

निवडणूक जिंकल्यावर पुन्हा एकदा आमचे नेते डॉ. विश्वजीत कदमच असतील आणि येत्या काळात त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार आम्ही केला, असे विशाल पाटील यांनी सांगितले. (Sangli Lok Sabha Constituency)

काँग्रेस गेल्या 60 वर्षांपासून लढवत असलेली जागी गेल्या निवडणुकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडावी लागली, यावेळी शिवसेनेला (UBT) सोडावी लागली. यावर बोलताना विशाल पाटील म्हणाले, हे बंड माझे एकट्याचे नसून, काँग्रेसच्या पक्षाच्या विचाराच्या लोकांचे बंड आहे.

आम्ही कार्यकर्त्यांनी पाच पाच वर्षे मतदारसंघात राबायचे, रस्त्यावर उतरायचे, आंदोलने करायची आणि निवडणूक आली की, जागा दुसऱ्या पक्षाला सोडून द्यायची हे कार्यकर्त्यांना आवडले नाही, असे विशाल यांनी सांगितले.

सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला सुटावी यासाठी विशाल पाटील यांच्याबरोबरीने माजी मंत्री आणि पलूसचे आमदार विश्वजीत कदम यांनी शर्थीने प्रयत्न केले. मात्र, यामध्ये त्यांना यश आले नाही.

विश्वजीत कदम यांच्याविषयी बोलताना विशाल म्हणाले, सांगली काँग्रेसला मिळावी म्हणून विश्वजीत कदमांनी प्रमाणिकपणे प्रयत्न केले. आमचे आधीच ठरले होते, वसंतदादांच्या विचाराला मानणाऱ्या सर्वांचे नेतृत्त्व विश्वजीत कदम करतील. त्यामुळे त्यांनी आम्हा सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केला होता. पण दुर्दैवाने पक्षाने आमची अडचण केली. हा माझ्यावर जेवढा अन्याय आहे, तेवढाच अन्याय विश्वजीत कदम यांच्यावर आहे.

विश्वजीत कदम पक्षाचे शिपाई आहेत. ते म्हणतात त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षाचा आदेश मान्य करत महाविकास आघाडीचा प्रचार सुरु केला आहे. पण ही निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा विश्वजीत कदमच आमचे नेते असतील. त्यात काही बदल घडणार नाही. आणि येत्या काळात त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा आम्ही निर्धार केला आहे.

तिरंगी लढत

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना (UBT) आणि अपक्ष विशाल पाटील अशी लढत होणार आहे.

भाजपने सांगलीत विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही सर्वच पक्षातील बंडखोर आणि वसंतदादा गटाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर दोन्ही उमेदवारांना टक्कर देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi-Hindi controversy : मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

ITI Courses: ‘आयटीआय’मध्ये सहा नवे अभ्यासक्रम; कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

सायना नेहवालचा घटस्फोट, इन्स्टा पोस्टमधून केलं जाहीर; १० वर्षे रिलेशनशिपनंतर लग्न, ७ वर्षांचा संसार

Satara News :'परतीच्या प्रवासात माउली फलटणमध्ये'; मुक्‍कामस्‍थळी आरतीसाठी गर्दी, पालखीसोबत दोन हजार वारकरी

Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT