sanjay mandlik
sanjay mandlik  esakal
महाराष्ट्र

कोल्हापुरातील अदानी-अंबानीपासून सावध रहा; मंडलिकांची सूचक टीका

सुनील पाटील

कोल्हापूर : राजकीय जोडे बाहेर ठेवून जिल्हा बॅंकेची (Bank Election) निवडणूक लढवणारे बाहेर येताना भाजपचे जोडे घालू नयेत म्हणजे झाले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणूकीत, वेगवेगळ्या लोकांची साथ घ्यायची आणि सर्व संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या हिच भूमिका काही नेत्यांची आहे. या देशात अदानी-अंबानी (Ambani-Adani) राज्य करत आहेत असे म्हणतात, पण कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील अदानी आणि अंबानी आहेत, यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. अशी टिका खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan MUshrif)आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांचे नाव न घेता केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणूकीच्या (KDCC Bank Election)पार्श्‍वभूमीवर शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या ठरावदार मतदारांचा मेळावा कळंबा येथे झाला. यावेळी ते बोलत होते.

खासदार मंडलिक म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत राजकीय पादत्राणे बाहेर ठेवा म्हणून सांगणाऱ्यांनी हिंमत असेल तर मतदारांना टोकण देवू नका, पाकिट देवू नका, सहलीवर घेवून जावू नका मग जिल्हा बॅंकेत परिवर्तन निश्‍चित झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा बॅंकेच्या प्रक्रिया गटातील मतदारांना टोकण वाटप केले जात आहे. त्यांची शपथ घेतली जात आहे. जर तुमचा कारभार चांगला आहे, तर शपथा घ्यायला मतदाराना उचलून घेवून जावू नका. त्यांना पैशाचे आमिष दाखवू नका.

मुश्रीफ यांनी बॅंकेची निवडणूक बिनविरोध करायला सांगितले होते. या दुमत नाही. पण, स्वाभिमान गहाण ठेवून सत्तारूढ पॅनेलमध्ये जाणे अशक्‍य होते. त्यामुळे आम्ही समविचारी आघाडी केली. आम्ही म्हणतोय तेच करा हे चालणार नाही. यावेळी, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, माजी आमदार चंद्रदिप नरके, सत्यजीत पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अजित नरके, एस.आर.पाटील, रवी मडके उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT