Sanjay Raut Latest News Sanjay Raut Latest News
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : राऊत जेलमध्ये गेल्याचा आनंद; बाळासाहेबांच्या चालकाने वाटले पेढे

दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि पेढे वाटले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार व दुसऱ्या क्रमांकाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (ता. ४) ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांना अटक झाल्याने विरोधकांकडून अनेक आरोप केले जात आहे. दुसरीकडे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या वाहनाच्या चालकाने (Driver) पेढे वाटले आहे. (Sanjay Raut Latest News)

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार संजय राऊत यांचे नाव सतत चर्चेत आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर राऊतांवर (Sanjay Raut) आरोप वाढले आहे. शिवसेना संपवण्यात संजय राऊत यांचा हात आहे. संजय राऊत यांच्यामुळेच आम्ही बंड केल्याचे अनेक आमदारांनी म्हटले आहे.

हे सर्व आरोप-प्रत्यारोप होत असताना संजय राऊत यांच्या घरी ईडीने (ED Action) रविवारी धाड टाकली. त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. यामुळे सत्ताधारी आनंदी तर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सर्व सुरू असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या चालकाने (Driver) दिल्लीत जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि पेढे वाटले. बाळासाहेबांचा हा चालक धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून दिल्लीला गेला आणि पेढे वाटले. संजय राऊत जेलमध्ये गेल्याचा आनंद झाल्याचे त्याने म्हटले. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली. राऊतांनी चुकीचे काम केले, असेही त्याने सांगितले. १९९३ ते २००० पर्यंत तो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या वाहनाचा चालक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT