Sanjay Raut Bhagatsingh Koshyari Sakal
महाराष्ट्र बातम्या

...हे अपेक्षितच होतं! राऊतांच्या अटकेवरुन सामनातून राज्यपालांवर निशाणा

१६ तासांच्या चौकशीनंतर रात्री शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानाने मोठा गदारोळ माजला होता. त्यावरुनच आता सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून निशाणा साधला आहे. तर या विधानावरुन लक्ष वळवण्यासाठी संजय राऊतांना अटक कऱण्यात आली आहे, असंही सामनात म्हटलं आहे.

काय होतं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं विधान?

मुंबई आणि ठाण्यातून गुजराती व राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर तुमच्याकडे पैसाच उरणार नाही. तुम्ही या मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता, पण गुजराती, राजस्थानी लोक इथं नसतील तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताच येणार नाही, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. या विधानाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते. यावरुनच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. या प्रकरणाचा संबंध शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईशी जोडला आहे.

राज्यपालांच्या विधानावरुन भाजपा आणि शिंदे गटावर टीका करताना अग्रलेखात म्हटलं आहे की, "राज्यपालांचं हे विधान महाराष्ट्राचा अपमान करणं आहे. एकतर राज्यपालांनी माफी मागावी किंवा केंद्राने त्यांनी परत बोलवावं, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली, पण त्यातही अपवाद आहेच. भाजपा व सरकारमधल्या शिंदे गटाने राज्यपालांच्या मराठी द्रोहावर नाममात्र तोंड उघडलं. ते त्यांच्या स्वभावास व लौकिकास धरुनच आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावरुन संतापाचा भडका उडाला".

"तो भडका आणि रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतंच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी लोकांच्या मनातील भडका विझणार नाही. संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला आणि रविवारी सकाळी त्यांच्या घरी ईडीची पथकं पोहोचली. लोक काय ते समजून गेले".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT