Sanjay-Raut-Pm-Modi-Amit-Shah sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: ईडीमागे लागताच अमित शाहांना राऊतांचा फोन, वाचा काय म्हणाले?

शिवसेना आणि ठाकरे परिवारावर मागील काही दिवसांपासून चिखलफेक होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना आणि ठाकरे परिवारावर मागील काही दिवसांपासून चिखलफेक होत आहे. त्याला आम्ही उत्तर देऊच. पण भाजपचे साडेतीन लोक तुरुंगामध्ये जाणार, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यानंतर त्यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपचे नेते आणि भाजपच्या एकूणच सुरू असलेल्या सर्व गोष्टींवर हल्लाबोल करत जोरदार समाचार घेतला. (Sanjay Raut Press Conference)

राऊत म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिल्या. अमित शहा, मोदींना विनंती आहे की, हीच का तुमची लोकशाही, तुम्ही मोठी भाषणं देता, मात्र अशा पद्धतीने धमक्या देताय, मुलांना टार्गेट करताय हे चुकीचे असून, जे काही बोलायचे आहे ते माझ्याशी बोला असे राऊत म्हणाले. ज्यावेळी ईडीचे अधिकारी माझ्यावर कारवाई करण्यासाठी आले होते, त्यावेळी मी अमित शहांना फोन केला करत जे काही चाललंय ते योग्य नसून, माझ्याशी शत्रूत्व असेल तर, मला धरा, पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना का त्रास देताय असा प्रश्न विचारला होता असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, आता हे मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला लागले असे म्हणत,चौकशीसाठी आता हे हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेल्याचे राऊत म्हणाले. गुजरातमध्ये इतका घोटाळा झाला त्याचं काहीच केलं नाही. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला होता. त्यात कार्पेट टाकलेलं त्याची किंमत साडेनऊ कोटी होती. घरात शिरायचं नाही, पण तुम्ही आमच्या घरात शिरताय, मुलांच्या, नातेवाईकांच्या घरात शिरताय असे म्हणत जेलमध्ये टाकणार आहात टाका, पण माझ्यासोबत तुम्हीही असणार आहात असे देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT