Sanjay Raut Raut on Devendra Fadnavis, Eknath shinde and bjp Sakal
महाराष्ट्र बातम्या

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? राऊतांचा शिंदे गटाला टोला

सत्तेतून फुटलेला गट मूळ शिवसेना कसा असू शकतो, राऊतांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

सत्तेतून फुटलेला गट मूळ शिवसेना कसा असू शकतो, राऊतांचा सवाल

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलं नाही. देशातील लोकशाही सोयीनुसार न्याय देणारी नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही. सत्तेतून फुटलेला एखादा गट मूळ शिवसेना कसा असू शकतो, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बंडखोर नेते खरंच शिवसेनेचे आमदार राहिले आहेत का? त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारा, असंही त्यांनी खडासावलं आहे. मध्यावती निवडणुका महाराष्ट्रात होऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

खासदार राऊत आज दिल्लीत बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर राऊत यांनी सवाल उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही निवडणूक घटनाबाह्य कशी काय केली जाऊ शकते. देशाच्या जनतेला यातून काय मिळणार आहे?, असंही त्यांनी विचारंल आहे. मुळ सत्तेतून फुटलेला गट शिवसेना कशी काय असून शकते हे बंडखोरांनी सांगावे, असंही त्यांनी विचारलं आहे.

राऊत म्हणाले, देशाचं राजकारण रक्तरंजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करुन राजकारण केलं जातं आहे. सुरुवातीला शिवसेनेला डावललं गेल आताही तो प्रयत्न होत आहे. यावरुन कळतं की, मुंबईतून सेनेला वेगळ करायचं आहे. (maharashtra politics) पुढे मध्यावती निवडणुकांबाबत पवारांनी केलेल्या वक्तव्याचा पाठवपुरावा करत राऊत म्हणाले, गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळं पवारांच्या भाकिताप्रमाणे मध्यावती निवडणुका होऊ शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लोक सोडून गेल्यानं सेना कमकुवत होत नाही. सेना कागदावर कमकुवत आणि जमिनीवर मजबूत आहे, असंही त्यांनी खडासावलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. ती खरी खोटी असा प्रश्न येत नाही. त्यामुळे जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना हे सुत्र आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, सेनेच्या स्थापनेपासून २८० सेना स्थापन झाल्या आहेत. पण त्यातील दोनच सेना टिकल्या. एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. त्यामुळं भारतीय राजकारणात या दोन्ही सेना कायम राहतील, अशी स्पष्टोक्ती ही राऊतांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT