Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत, तेव्हा उगाच आकडा लावून..; राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

राज्यात निवडणूक लागलेल्या 7 हजार 682 ग्रामपंचायतीपैकी भाजपनं एकूण 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात निवडणूक लागलेल्या 7 हजार 682 ग्रामपंचायतीपैकी भाजपनं एकूण 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय.

Gram Panchayat Election Results : राज्यात निवडणूक लागलेल्या 7 हजार 682 ग्रामपंचायतीपैकी भाजपनं एकूण 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 हजार 215 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलंय. शिंदे गटानं ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीसाठी रविवारी (18 डिसेंबर) मतदान झालं होतं. त्यानंतर काल (20 डिसेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपनं 2 हजार 23, राष्ट्रवादीनं 1 हजार 215, शिंदे गट 772, काँग्रेसनं 861, ठाकरे गट 639 तर इतर पक्षांनी 1 हजार 135 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

या निकालावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटव्दारे भाष्य केलंय. एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत, असं म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी, म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं? अशी टीका त्यांनी भाजपवर केलीये.

भाजपकडं सर्वाधिक सरपंच

  • भाजप 1 हजार 873

  • राष्ट्रवादी 1007

  • शिंदे गट 709

  • ठाकरे गट 571

  • काँग्रेस 657

  • इतर 967

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT