Sanjay Raut Marathi News  Sanjay Raut Marathi News
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; केली ‘ही’ मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी (ता. २८) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे गटातील १२ बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या १२ खासदारांनी राहुल शेवाळे यांना नेते आणि पाचवेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांना पक्षाचे प्रतोद घोषित केले होते. (Sanjay Raut Marathi News)

शिवसेनेच्या (Shivsena) १२ बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, असे सभापतींची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेनेचे नेते म्हणून सभापतींनी मान्यता दिली होती. शेवाळे यांनी १२ सदस्यांनी लोकसभेत गट स्थापन केला नसून त्यांच्या जागी विनायक राऊत यांची सभागृहातील नेतेपदी वर्णी लावली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती केली. संजय राऊत यांची राज्यसभेतील नेतेपदी तसेच दोन्ही सभागृहात सदस्य असलेल्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. बंडखोर खासदारांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.

शिवसेनेत फूट पडण्याची परिस्थिती बंडखोरांमुळे नाही तर भाजपमुळे निर्माण झाली आहे. तुम्ही लोकांनी कितीही बाण सोडले तरी माझ्याकडे धनुष्य आहे हे लक्षात ठेवा. कितीही संकटे आली तरी लढूनच पक्षाची नव्याने बांधणी करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT