औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम ११६, ११७ आणि १५३ अ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये राज ठाकरे यांचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. बाहेरच्या राज्यातले लोक येऊन महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवतायत असं राऊत म्हणाले असून त्याची गृहविभागानेही पुष्टी केली आहे.
संजय राऊत म्हणतात, "अशा प्रकारचे गुन्हे हे दाखल होत असतात. आमच्यावरही झाले आहेत. त्यात काय नवीन गोष्ट नाही. आमच्या लिखाणावर वक्तव्यावर झालेत. कायद्याचं उल्लंघन कोणीही करत असेल, ती कितीही मोठी असेल तरी त्यावर गुन्हे दाखल होतात. चिथावणीखोर भाषणं देण्यासाठी वगैरे. सरकारची भूमिका सरकार ठरवेल. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. मी आत्ताच गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत होतो. राज्यात शांतता आहे".
राज्याच्या बाहेरुन काही गुंड लोक मुंबईत आणून गडबड करायची. ज्यांची ताकद नाही, असे लोक हे करतायत. हे सुपारीचं राजकारण, याने राज्य चालणार नाही. मुंबईसह राज्याचं पोलीस खातं खंबीर, मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे राज्यावर, गृहमंत्री खंबीर आहेत.अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणं ही चूक, स्वतः उघडं पाडतील. मुख्यमंत्र्यांकडे सतत बैठका सुरू असतात, शासकीय बैठकीत काय झालं हे मी सांगणार नाही.
संजय राऊतांच्या आरोपांना पुष्टी देणारी आणखी एक माहिती समोर येत आहे. इतर राज्यातले लोक महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी राज्यात येत असल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. राज्याच्या गृहविभागाने हे स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.