Sanjay Raut said, lets keep Balasahebs Shiv Sena alive Sanjay Raut said, lets keep Balasahebs Shiv Sena alive
महाराष्ट्र बातम्या

...ही शिवसेनेच्या भव्य विजयाची सुरुवात; संजय राऊतांचे पुन्हा ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करायला सुरुवात केली आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी ‘हे दिवस निघून जाईल’ असे म्हटले तर दुसऱ्या ट्विटमध्ये ‘शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे’ असे म्हटले आहे. (Sanjay Raut said, lets keep Balasahebs Shiv Sena alive)

‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून अत्यंत कृपापूर्वक (gracefully) पायउतार झाले. आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेवू!’ असे ट्विटमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

तीन ते साडेतीन तास चाललेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (ता. ३०) बहुमत चाचणीस परवानगी दिली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर विरोधकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. यातून याचीच ते वाट पाहत असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शिवसेना उभी करणार असल्याचे सांगितले. तसेच संकेत ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत देत असल्याचे पाहायला मिळत आहे. लाठ्या खाऊ... तुरुंगात जाऊ... पण बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) धगधगत ठेवू!’ असे ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT