NCP Ajit Pawar News sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील; राजकीय वर्तुळातील बड्या नेत्याचं वक्तव्य

रोहित कणसे

राष्ट्रवादीते नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा राजकीय वर्तुळात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगला परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आलेत. यानंतर लवकरच अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि ही गोष्ट शिंदे गटातील नेत्यांनी स्वीकारली पाहिजे असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या बाहेर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख करत पोस्टर लावण्यात आले आहेत, याबद्दल विचारले असात राऊत म्हणाले की, मी खात्रीने सांगतो की ते भावी मुख्यमंत्री आहेतच आणि लवकरच मुख्यमंत्री देखील होतील.

भावी म्हणजे फार भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहितेय. काय घडामोडी घडतायत तेही माहिती आहे. मग त्या कायदेशीर, राजकीय किंवा घटनात्मक असतील. त्यांचं भविष्य लवकर-लवकर जवळ येतंय. त्यामुळे अजित पवार हे भविष्यात मुख्यमंत्री होतील. महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळेल. त्यांच्या (अजित पवार) वाढदिवसाला असे बॅनर लागले असतील तर हे सत्य शिंदे गटाने लवकर स्वीकारलं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था आधी सुधारा...

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. राऊत म्हणाले की, मणिपूरच्या विषयावर युरोपियन संसदेत चर्चा होते, पण त्या मुद्द्यावर पंतप्रधान आपल्या संसदेत चर्चा होऊ देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे असे संजय राऊत म्हणाले. ७० दिवस झाले मणिपूर अजून शांत करता येत नाही, आणि तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवता. मणिपूर हा याच देशाचा भाग आहे.

मणिपूरमध्ये महिलांना रस्त्यावर नग्न करून मारलं जातयं ही देशातील १४० कोटी जनतेसाठी चिंतेची बाब आहे. समान नागरी आणताय पण त्याआधी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था आधी सुधारा असा टोला संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

सुजित पाटकरांना अटक

कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सुजित पाटकरांना अटक झाल्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, मुंबईत सगळ्याच कोविड सेंटरनी उत्तम काम केलं. पण सगळ्यांनी या काळात चांगलं काम केलं, याचा फायदा महानगरपालिकेत होईल म्हणून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे, असे राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT