Sanjay Raut News e sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही - संजय राऊत

'तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं.'

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं. त्यामुळे तुमचे आभार, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील शिवसंपर्क अभियानात ते आज रविवारी (ता.२९) बोलत होते. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही. माननीय बाळासाहेबांच्या प्रेरणातून शिवसेना उभी आहे. कोणी कितीही आपटले तरी काहीही होणार नाही, अशी टीका राऊतांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर (BJP) केली. (Sanjay Raut Say, In Future BJP Not Come Into Power In Maharashtra)

आज सकाळीच शाहू महाराजांच्या वाड्यात जाऊन आलो. आम्ही म्हणे संभाजीराजेंना फसवले. हे कोण म्हणतयं. तर भाजप. फसवाफसवीची भाषा करणारे आम्हाला म्हणतयं की आम्ही फसवलं, असे ते म्हणाले. या पुढेही उद्धव ठाकरे राज्याचे नेतृत्व करतील. शाहू छत्रपती बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्व भाजपचे नेते आडवे झाले आहेत, असे राऊत म्हणाले.

शिवसेना प्रखर हिंदुत्ववाद्यांची संघटना आहे. काश्मीरमध्ये हल्ला झाला. काश्मीरमध्ये तीन महिन्यांमध्ये अतिरेक्यांचे ५८ हल्ले झाले. सैनिकांचा मृत्यू झालां. भाजपचे सरकार काय करत आहे, असा सवाल त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inflation: महागाईचा पुन्हा भडका! आले-लसूण अन् कांद्याने वाढवल्या चिंता; कोणत्या राज्यात महागाई सर्वाधिक? ग्रामीण भागाला मोठा फटका?

Pet Lovers साठी महत्त्वाची बातमी! कुत्रा-मांजर पाळता? तर आधी परवाना घ्या; लायसन्स सक्तीचे; नियम मोडल्यास काय होणार?

'झपाटलेला'चं 'हे' सिक्रेट आजवर कळलंच नाही; सिनेमात एक नाही तर 9 तात्या विंचू होते! कितीही वेळा फिल्म पाहिली तरी हे लक्षात आलं नसेल

Latest Marathi News Live Update : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन चौकशी लावली- बावनकुळे

Jharkhand Naxal-Free Push: झारखंड नक्षलमुक्तीकडे मोठे पाऊल; चाईबासाही नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर

SCROLL FOR NEXT