Sanjay Raut on Goa Election 2022
Sanjay Raut on Goa Election 2022 sakal
महाराष्ट्र

महाआघाडीचं स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात राहील - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

आमची तयारी काय आहे हे विरोधक सांगू शकतील कारण ते दबावाचे राजकारण करतात

सध्या देशभर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा चालु असून या राज्यात नेत्यांचे दौरे आणि गाठीभेटींनी वेग वाढवला आहे. आज महाविकास आघाडी सरकरामधील आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे गोवा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते गोव्यातील काही ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान, गोव्याच्या विधानसेभेवरून (Goa Election 2022) आता खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी विरोधकांवर निशाणा साधाला आहे. आमची तयारी काय आहे हे विरोधक सांगू शकतील. ते दबावाचे राजकारण करतात मात्र महाविकास आघाडीला तडा जात नाही आणि कधी जाणारही नाही, अशी खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

गोव्याच्या राजकारणाविषयी ते म्हणाले, गोवा राज्य लहान असेल तरी गोवेकरांचा इतिहास मोठा आहे. गोव्याच्या (Goa) या लढ्यात शिवसेनाही आहे. मराठी लोकांनी गोवा स्वतंत्र्य केले आहे शिवसेना अकरा जागा लढत आहे. यामध्ये ख्रिश्चन उमेदवार आहेत. आज आदित्य ठाकरे येत आहे. त्यांची वास्कोला सभा होणार आहे. त्यानंतर ते लोकांना भेटतील आणि संवाद साधतील. याकाळात अनेक भेटीगाठी होणार आहेत. उद्या ते मुख्यमंत्री मतदारसंघात जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. (Sanjay Raut on Goa Election 2022)

पुढे ते म्हणाले, आम्ही इतकं करून थांबणार नाही. निवडणूक संपल्यावर गोव्यात आम्ही लोकसभेची तयारी सुरू करणार आहोत. दोन्ही जागा शिवसेनाच लढवणार आहे. यावेळी निवडून आलो तर सरकारमध्ये सहभागी होऊ मात्र आमचे आमदार निवडून येणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. भाजपची (BJP) कळ वेगळ्या प्रकारची आहे. ते दबावाचे राजकारण करताच. मात्र त्यांनी लक्षात घ्यावं की, महाविकास आघाडीला कधीही तडा जात नाही आणि जाणारही नाही. महविकाआघाडी सरकारचे स्टिअरिंग हे ठाकरेंच्या हातात आहे.

ईडीच्या (ED) कारवाई संदर्भात ते म्हणाले, माझी संपत्ती असेल तर त्यांनी घेऊन टाकावी, मी मराठी आहे. हे षडद्यंत्र आहे मुंबई महापालिका निवडणुकीत काय ते कळेलच असे सूचक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. पंतप्रधानांच्या (PM Modi) टीकेवर ते म्हणाले, गोव्यात सगळ्यांना दिले. ही देवभूमी आहे. चर्च आणि मंदिरही आहेत. लडाखमध्ये चिनी सैन्य येऊन बसले आहे. एक वर्ष तुम्ही वाटाघाटी करता आहात. गोवा स्वतंत्र होऊन जमाना झाला आता तुम्ही चीनचे नाव घेत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना वाटत बहुमत मिळणार आहे. आत्मविश्वास चांगला आहे. मात्र पंतप्रधानांंच्या सभा केरळ, बंगालमध्ये झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस बरोबर बोलतात. मी म्हणतो त्यांना चाळीस पैकी ४२ जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT