Sanjay raut ED action News
Sanjay raut ED action News Sanjay raut ED action News
महाराष्ट्र

Sanjay Raut : राऊतांच्या घरी सापडलेल्या डायरीतून उलगडणार घोटाळ्याचे रहस्य?

सकाळ डिजिटल टीम

Sanjay raut News मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. त्यांना गुरुवारी (ता. ४) पुन्हा न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढवण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झडती घेतली असता एक डायरी (Diary) सापडली आहे. ही डायरी महत्त्वाचा दुवा ठरू शकते, असा ईडीचा दावा आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. यावेळी ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली होती. यानंतर रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. राऊतांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.

यादरम्यान राऊतांच्या (Sanjay Raut) घरातून साडेअकरा लाख रुपये जप्त करण्यात आले होते. तसेच कागदपत्रे व एक डायरीही जप्त केली आहे. या डायरीतील कोडवर्डमध्ये काही महत्त्वाची माहिती आढळल्याचे सांगण्यात येत आहे. कोडवर्डमध्ये पैसे कोणाला दिले याचा उल्लेख असल्याचा ईडीचा (ED) दावा आहे. तसेच संजय राऊत यांच्या विरोधात त्यांच्या घरातूनच पुरावे सापडल्याचा दावा ईडीने केला आहे.

संजय राऊत यांच्या खोलीतून ईडीने ही डायरी जप्त केली आहे. या डायरीत (Diary) १ कोटी १७ लाख रुपये ज्यांना दिले त्यांची नावे कोडवर्डमध्ये दिल्याचा दावा ईडीने केला आहे. मात्र, याबाबत संजय राऊतांनी काहीही सांगितले नाही. गुरुवारी (ता. ४) राऊतांना कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने डायरीचा संदर्भ देत कोठडी वाढवून घेतल्याची माहिती आहे.

कोडमध्ये लिहिली गेली नावे

शिवसेनेचे (Shiv sena) खासदार संजय राऊत यांच्या घरी सापडलेली डायरी महत्त्वाची समजली जात आहे. पत्राचाळ घोटाळ्यातून मिळालेल्या पैशाचा वापर पेमेंट करण्यासाठी करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. डायरीत लोकांची नावे कोणाला कळू नये म्हणून कोडच्या स्वरूपात लिहिल्या गेल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडी आता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT