Sanjay Raut Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच - संजय राऊत

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर संजय राऊतांनी ही टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पाडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका कृतीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. यावेळी शेजारी बसलेल्या फडणवीसांनी हळूच खिशातून पेन काढला, एक चिठ्ठी लिहिली आणि नकळत ती एकनाथ शिंदेंकडे सरकवली. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून त्यावर अनेक नेत्यांनी टीकाही केली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट ओढतात, अशा अनेक गमतीजमती राज्यात होत असतात. खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच(Devendra Fadnavis) आहेत. यापूर्वी अजित पवारांनीही या प्रकारावरुन राज्य सरकारवर टीका केली होती. काल माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, २.५ वर्षात आम्ही कधी माईक कधी खेचला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढा ओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं. कॅमेऱ्यामध्ये सगळं काही दिसत असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT