sanjay raut
sanjay raut esakal
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'थुंकण्यावर बंदी आहे का? दाताखाली जीभ अडकल्याने थुंकलो', संजय राऊतांचं अजबच स्पष्टीकरण

संतोष कानडे

नाशिकः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी श्रीकांत शिंदे यांच्यासंबंधीच्या प्रश्नावर बोलतांना संजय राऊतांनी 'थूं' असं म्हणत मान बाजूला करुन थुंकण्याचा प्रकार केला होता. मात्र संध्याकाळी त्यावर स्पष्टीकरण देतांना राऊतांनी दाताखाली जीभ अडकल्याने थुंकल्याचं म्हटलं आहे.

काय केलं संजय राऊतांनी?

आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेबद्दल हा प्रश्न होता. 'ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले होते. त्याबद्दल विचारल्यानंतर संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं.. पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव सांगताच, संजय राऊतांनी कॅमेऱ्यासमोरच बाजूला झुकून थूं.. असं केलं. त्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.

नरेश म्हस्केंचं जोरदार उत्तर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्त नरेश म्हस्के यांनी एक व्हीडिओ ट्वट करीत संजय राऊतांवर आसूड ओढला. 'सत्ता गेल्यामुळे संजय राऊत हतबल झाले आहेत. आज थुंकत आहेत, थोड्या दिवसात स्वतःचे कपडे फाडून दगड मारीत रस्त्यावर फिरणार आहेत. त्यांना बरोबर घेऊन फिरणाऱ्या शरद पवार साहेब आणि उध्दव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर करावी' असं ट्वीट म्हस्के यांनी केलं आहे.

संजय राऊतांचं स्पष्टीकरण

संजय राऊतांना थुंकण्याबद्दल विचारलं असता त्यांनी जोरात हसून उत्तर दिलं. ते म्हणाले की, थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा मग. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असं समर्थन राऊतांनी केलं. ते पुढे म्हणाले की, कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Brijbhushan Singh : ...तर ब्रिजभूषण सिंह काँग्रेसमध्ये दिसले असते, सोनिया गांधींची होती संमती; स्वतःच सांगितला किस्सा

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT