sharad pawar and sanjay raut 
महाराष्ट्र बातम्या

Political News : राजकारणात भूकंप होणार! संजय राऊत राष्ट्रवादीत तर उद्धव ठाकरे... ; भाजप नेत्याचा दावा

Sandip Kapde

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे १० जूनपूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या संदर्भात राऊतांच्या बैठका देखील झाल्या आहेत, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले, अजित पवार यांनी पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो. ही राऊत यांची अट आहे. त्यामुळे सातत्याने अजित पवार यांच्या विरोधात ते वक्तव्य करत असतात. अजित पवारांवर ते टीका करत असतात.

उद्धव ठाकरे यांचे काही खरं नाही. त्यांचा स्वत:चा पक्ष राहीला नाही. मला उद्धव ठाकरे परत खासदार बनवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यात काही रस नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी घेतल्याचे नितेश राणे म्हणाले.

शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला. तेव्हा संजय राऊत यांना त्यांच्या व्यासपीठावर जायचे होते. म्हणून ते सकाळपासून ते शरद पवार यांना संपर्क करत होते. मात्र शरद पवार यांच्यासोबत त्यांचा संपर्क होत नव्हता. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय ती संजय राऊत साप आहे. राऊत कोणाचेच नाहीत, असे राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT