Sanjay Raut   eSakal
महाराष्ट्र बातम्या

"हे दुष्टचक्र..."; राज्यसभेच्या जागेच्या प्रश्नावर संजय राऊत संतापले

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, यावरून सध्या सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

वैष्णवी कारंजकर

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा पेच अजूनही कायम आहे. हा सहावा उमेदवार कोणाचा असेल, याबाबत सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. याच संदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी एक सूचक ट्विट केलंय. महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या दिसू लागल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी या संदर्भातलं ट्विट केलं आहे. राऊतांनी आपल्या ट्विटमधून विरोधकांवर बोचरी टीका केली आहे. राऊत म्हणाले, "राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची ईर्ष्या दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा, त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे, जितेंगे".

राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे. भाजपाचे (BJP) २, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसचा (Congress) प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. तर सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारं संख्याबळ राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारकडे (Maha Vikas Aghadi Government) आहे, त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. तर भाजपाही सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT