sanjay raut sakal media
महाराष्ट्र बातम्या

'...आणि भाजपच्या कर्नाटकात हा प्रकार घडतो!' संजय राऊत भडकले

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. यानंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिवप्रेमींनी एकत्र येत त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला.

मात्र, बेळगावच्या मुद्द्यावर आता शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसतंय. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. (Sanjay Raut Tweet)

दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते.. हे चित्र बेंगळुरू येथील आहे.. धिक्कार!धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!! अशा आशयाचं ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर ते आज बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sanjay Raut Tweet

या प्रकारानंतर बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाला असून शिवप्रेमी नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौकात (Dharmaveer Sambhaji Maharaj Chowk) जमून सर्व रस्ते बंद केले. तसेच या घटनेच्या विरोधात ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आली असून धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शनिवारी बेळगाव शहरात बंद सदृश्य वातावरण पाहायला मिळतंय. शनिवारी सकाळी 10 वाजता शिवाजी उद्यानापासून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना (Collector of Belagavi) निवेदन देण्यात येणार आहे यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Belgaum Latest News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT