Sanjay Rauts tweet after Uddhav Thackerays resignation Sanjay Rauts tweet after Uddhav Thackerays resignation
महाराष्ट्र बातम्या

‘ये दिन भी निकल जायंगे..’ संजय राऊतांचे ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : तीन ते साडेतीन तास चाललेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (ता. ३०) बहुमत चाचणीस परवानगी दिली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून

‘न्याय देवता का सन्मान होगा!

फायर टेस्ट fire test

अग्निपरीक्षा की घडी हैं.

ये दीन भी निकल जायंगे..

जय महाराष्ट्र!’ असे ट्विट केले.

(Sanjay Rauts tweet after Uddhav Thackerays resignation)

मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देतील अशी चर्चा होती. मात्र, याबाबत कोणीही काही बोलत नव्हते. मात्र, सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी बहुमत चाचणी होणार असल्याचे सांगितले. यानंतर उद्धव ठाकरे नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे समजले. आता ते राजीनामा देतील का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत होता. सर्व प्रश्नांना त्यांनी पूर्णविराम लावत राजीनामा देत असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचे सांगताच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केले. ‘न्याय देवताचा सन्मान होणार! फायर टेस्ट fire test, अग्निपरीक्षेची वेळ आहे. हे दिवस पण निघून जाईल. जय महाराष्ट्र!’ असे ट्विट केले. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरही शिवसेना (Shiv sena) आशावादी असल्याचे संकेत यातून त्यांनी दिले.

सुखाचे दिवस जसे निघून जातात तसे दुखाचेही दिवस निघून जाईल. ही अग्निपरीक्षेची वेळ आहे. यातून सावरणे गरजेचे आहे. बहुमत चाचणी होणार आणि यातून आपण जिंकू शकतो, असा संजय राऊत यांना ‘फायर टेस्ट fire test’ यातून म्हणायचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT