Nitesh Rane News Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुप्रीम कोर्टात आज फैसला

पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक करु नये असंही हायकोर्टानं म्हटलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक करु नये असंही हायकोर्टानं म्हटलं होतं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील (Kankavali) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी हायकोर्टानं त्यांचा जामीन फेटाळला होता. मात्र आज न्यायालयात नितेश राणे यांच्याकडून मुकुल रोहतगी हे बाजू मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. (Nitesh Rane News Updates)

दरम्यान, नितेश राणे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांना (Sindhudurg Police) तपासात सहकार्य करताना दिसत आहेत. मध्यंतरी नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. पण राज्यसरकारने न्यायालयात (Maharashtra Government) सुनावणी संपेपर्यंत अटक करणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर ते माध्यमांसमोर आले होते. (Santosh Parab attack case)

काय आहे नेमकी घटना ?

जिल्हा बँक निवडणूक प्रकरणी राजकीय संघर्षातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ल्यामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता. याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये म्हणून सुरुवातीला नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टातही (High Court) धाव घेतली पण दोन्हीकडे नितेश राणे यांना दिलासा मिळाला नाही. पण पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक करु नये असंही हायकोर्टानं म्हटलं होतं. त्यामुळं राणेंना काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT