Satara Latest Marathi News Satara Politics News 
महाराष्ट्र बातम्या

अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती; पवारांचा केंद्रावर निशाणा

Balkrishna Madhale

सातारा : 'आज शेतकऱ्यांना थंडीत ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती. त्यांची संवेदना शेती व शेतकऱ्यांशी निगडित होती. आजचे राज्यकर्ते त्यातून काही शिकतील अशा प्रकारची अपेक्षा अण्णासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी करतो', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईत कार्यक्रम झाला. देशाच्या कृषी क्षेत्रात प्रचंड योगदान देणाऱ्या व सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सबंध वर्षांत विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या संकल्पनेची शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. 

'केंद्रात अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा व दृष्टीचा ठसा उमटवला. संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं व या क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यात सहभागी करून घेतलं. देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होतं त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं', असे शरद पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती. म्हणूनच त्यांनी अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली व विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली. अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा व दृष्टीचा ठसा उमटवला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती. त्यांनी अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली व विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली, असेही पवार यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Cancel: इस्रायल-इराण युद्धाचा फटका! पुणे-मुंबईहून परदेशी जाणारी विमाने रद्द; देशभरात विमानतळांवर प्रवासी अडकले

Pune Transport Strike: टोल, कर, ई-चलन धोरणाविरोधात पाच मार्चपासून बेमुदत आंदोलन

Agra STF Encounter: एसटीएफचा 'धडाका'! शार्पशूटर गुंडाचा आग्र्यात एन्काउंटर; १० वर्षांपूर्वी लुटलेली सरकारी पिस्तूल अखेर जप्त

Devotional Journey: शेगाव वारीचा अलौकिक अनुभव! डोळे भरून दर्शन घेताच जीवन कृतार्थ झालं

Niphad Online Ration Card : जुनी रेशनकार्ड इतिहासजमा; आता घराघरात ई-शिधापत्रिका, गैरव्यवहाराला बसणार पूर्ण आळा

SCROLL FOR NEXT