Devendra Fadnavis - Satish Uke Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

ED ची कारवाई पुरावे नष्ट करण्यासाठी; सतीश उकेंच्या कुटुंबीयाचे आरोप

सतीश उकेंच्या घरावर आज सकाळी धाड पडली.

सुधीर काकडे

काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी आज सकाळी ईडीने धाड टाकली. पहाटेच ईडीचं पथक नागपुरात दाखल झालं होतं. सकाळी ५ वाजेच्या सुमारस इडीचं पथक दाखल झालं, त्यानंतर त्यांनी चौकशी करून सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलं.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडीचं धाडसत्र सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते आणि त्यांचे नीकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. त्यातच आज ईडीने सतीश उके यांच्या घरावर धाड टाकली. सहा तासांच्या चौकशीनंतर सतीश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत.

ईडीने केलेल्या कारवाईनंतर उके यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना कुटुंबीयांनी सांगितलं की, सकाळी साडेपाच वाजता ईडीचे अधिकारी आले. आमचे मोबाईल जमा केले. मुलांना शाळेत जाऊन देण्याची मुभा त्यांनी दिली. आम्हाला सतीश उके यांचे कागदपत्र हवे आहेत असं ईडीचे अधिकारी म्हणत होते असं कुटुंबीयांनी सांगितलं. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक केसेस केल्या आहेत. त्यातल्या एका प्रकरणाचा निकाल दोन दिवसात लागणार आहे असंही कुटुंबीयांनी सांगितलं.

कुटुंबीयांनी पुढे सांगितलं की, त्यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला. महिनाभरापासून रेकी सुरू होती. कोण काय करतं याची सगळी माहिती घेतली होती. लॅपटॉपमधील भविष्यातील केसेसचे तपशील घेतले. लोया केसचाही त्यामध्ये समावेश आहे. हे सर्व पुरावे नष्ट कऱण्यासाठी घेऊन गेले असून, सूडबुद्धीमुळे हे सर्व झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT